• Home
  • माझा जिल्हा
  • जेनेरिक औषधांची ‘दुकानदारी’ सुरूच; आणखी दोन कंपन्यांना राज्य सरकारच्या पायघडय़ा
Image

जेनेरिक औषधांची ‘दुकानदारी’ सुरूच; आणखी दोन कंपन्यांना राज्य सरकारच्या पायघडय़ा

प्रतिनिधी

राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि सरकारी रुग्णालयांच्या आवारात स्वस्त दरातील जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यासाठी दिल्लीस्थित एका संस्थेवर सरकारने मेहरबानी दाखविल्याची घटना न्यायप्रविष्ठ असतानाच आता आणखी दोन संस्थांनाही अशी दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या निर्णयानुसार, ‘एचएलएल लाईफ केअर लि’ आणि ‘एचएससीसी (इंडिया) लि’ या दोन कंपन्यांना राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधी दुकाने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या कंपन्यांच्या आडून राज्यातील काही ठेकेदाराच आपली दुकाने थाटण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कंपन्या असल्याचा वैदयकीय शिक्षण विभागाचा दावा आहे. आता पूर्वीच्या निविदेचा कालावधी संपल्याचे कारण दाखवून या दोन्ही कंपन्यांना पुन्हा एकदा जेनेरिक औषधांची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

‘नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्यूरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग को. ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया’ (नॅकोफ इंडिया लिमिटेड) ही दिल्लीतील बहुराज्यीय सहकारी संस्था आहे. या संस्थेने आजवर गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी भाजपशासित राज्यांमध्ये तांदूळ, चणाडाळ, साखर, खते, बियाणे अशा कृषिक्षेत्राशी संबंधित वस्तूंचा पुरवठा केला आहे. या कंपनीला राज्यातील नगरपालिका तसेच महापालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांत औषधालये सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026