• Home
  • क्राईम
  • कात्रजमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार
Image

कात्रजमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार

प्रतिनिधी

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर दोन गटांत झालेल्या हाणामारीमध्ये दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.

संतोषनगर भागातील घुंगुरवाला चाळ परिसरात तरुण बुधवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होती. त्या वेळी तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या वेळी एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, तो सराइत असल्याची माहिती देण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026