• Home
  • क्राईम
  • पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Image

पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी

पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंदननगर भागात घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेल रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

नवनाथ आणि त्याच्या पत्नीत वाद झाले होते. ती माहेरी निघून आली होती. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता. तो सासूरवाडीत गेला. त्यावेळी त्याने पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तिने चंदननगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे सांगितले.

त्यानंतर नवनाथ तेथे गेला. पोलीस चौकीत जाताना त्याने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरले. पोलीस चौकीत गेल्यानंतर त्याने सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. पत्नी नांदायला येत नसल्याने चिडलेल्या नवनाथने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतले. पोलीस चैाकीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला रोखले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026