मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

श्री सोमेश्वर साखर कारखाना करणार रु.१००/- प्रमाणे दुसरा हप्ता वर्ग श्री. पुरुषोत्तम जगताप

mnewsmarathi 04 May 2024 1 मिनिट वाचन 9,149 वाचन

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली असून कारखान्याने १७६ दिवसांमध्ये एकूण १५,२३.८७६ मे. टन ऊसाचे सर्वोच्च गाळप करुन बी हेवीसह १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखून १८,२६,५०० किंवटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरीमधून ८४,३१,४३८ लि. अल्कोहोल, ३१,८२,५५४ लि. इथेनॉलचे उत्पादन व को-जन प्रकल्पातून ९,६५,१५,३४५ युनिटस् विजेची निर्मिती होवून ५,१४,४४,८३१ युनिटची विक्री झालेली असून सध्या हे दोन्हीही प्रकल्प सुरु आहेत. या गळीत हंगामामध्ये राज्यातील ७,५०० मे.टन प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांमध्ये आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वोच्च गाळप व साखर उत्पादन झाले असून हंगाम कालावधीमध्ये प्रतिदिन सरासरी ८,६५८ मे.टन गाळप करुन स्थापित क्षमतेनुसार ११५% कार्यक्षमतेने २,०३,८७६ मे.टन ज्यादाचे गाळप आपण केलेले आहे अशी माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने ऊस बिलापोटी प्रथम हप्ता रु.३,०००/- प्र.मे.टन प्रमाणे दि.१५/०४/२०२४ पर्यंत गळीतास आलेल्या ऊसास आदा केलेला असून अंतिम पंधरवडयाचे बील रु.३,०००/- अधिक रु.२००/- प्रमाणे अनुदान दि.०४/०५/२०२४ रोजी जमा करणार आहोत. तसेच कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या ऊसाला माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल, २०२४ साठी अनुक्रमे रु.७५, रु.१००, रु.१५० व रु.२०० असे अनुदानही यापुर्वीच आदा केलेले आहे.

श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हंगाम २०२३-२०२४ मध्ये गाळपास आलेल्या गेटकेनसह सर्व ऊसासाठी दुसरा हप्ता प्र.मे.टन रु.१००/- प्रमाणे दि.०६/०५/२०२४ रोजी ऊस पुरवठादाराच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहोत. तसेच अंतिम ऊस दराबाबत सोमेश्वर हा राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेने कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास संचालक मंडळाच्यावतीने श्री. जगताप यांनी व्यक्त केला. तसेच हा हंगाम यशस्वी पार पाडल्याबद्दल कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस तोड पुरवठादार, ऊस तोड कामगार या सर्वांचे मी आभार मानतो असेही श्री. जगताप म्हणाले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi