• Home
  • क्राईम
  • प्रेयसीने संपर्क तोडल्याने तिच्या बहिणीवर गोळीबार
Image

प्रेयसीने संपर्क तोडल्याने तिच्या बहिणीवर गोळीबार

प्रतिनिधी

गेल्या महिन्यात शहरात सलग चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या असतानाच शहराच्या मध्यभागात एकाने तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. प्रेयसीने संपर्क तोडल्याने एका तरुणाने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गंज पेठेत घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. खडक पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ऋषी बागुल आणि त्याचा साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका १८ वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत ही घटना घडली.

तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. त्यांचा पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे. तिची मोठी बहिण घटस्फोटित आहे. आरोपी ऋषी बागुलचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत. कुटुंबीयांना याबाबतची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वाद झाल्यानंतर बहिणीने आरोपी ऋषीशी संपर्क तोडला. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता.

ऋषी त्याच्या मित्रासोबत प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री दोनच्या सुमारास गंज पेठेत आला. त्याने घराचा दरवाजा जोरात वाजवून प्रेयसीला भेटायला बोलाविले. ती घरी नव्हती. तक्रारदार तरुणी आणि तिच्या मावस बहिणीने याबाबतची माहिती ऋषीला दिली. त्यानंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

तक्रारदार तरुणीला बहिणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधायला लावला. तेव्हा तिने बिल न भरल्याने मोबाइलवरुन संपर्क साधता येणार नाही, असे ऋषीला सांगितले. तिने बहिणीला संदेश पाठविला. तेव्हा बहिणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर ऋषी चिडला आणि त्याने तक्रारदार तरुणीवर पिस्तूल रोखले. तिच्या दिशेने पिस्तुलातून एक गोळी झाडली. तक्रारदार तरुणी अणि तिची मावस बहिण तेथून पळाल्या. गोळीबारानंतर ठिणगी उडाल्याने तरुणीच्या मावस बहिणीला किरकोळ दुखापत झाली. दोघी घरात गेल्याने बचावल्या. त्यांनी आतून कडी लावली. आरोपींनी घराबाहेर शिवीगाळ करून गोंधळ घातला. तरुणीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ऋषीला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026