• Home
  • माझा जिल्हा
  • ब्रम्‍हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी ५० लक्ष रू. निधी वितरीत.
Image

ब्रम्‍हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी ५० लक्ष रू. निधी वितरीत.

प्रतिनिधी

मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने होणार उपाययोजना.

ब्रम्‍हपूरी वनविभागातील मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने संवेदनशील असलेल्‍या एकूण ६२ गावांकरिता डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सदर ६२ गावांकरिता प्रत्‍येकी २५ लक्ष रू. याप्रमाणे १५ कोटी ५० लक्ष रू. निधी दिनांक १ डिसेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयानुसार वितरीत करण्‍यात आला आहे.ब्रम्‍हपूरी वनविभागाचे क्षेत्र वनबहुल असून ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प या संरक्षीत क्षेत्राच्‍या लगत असल्‍याने तसेच ब्रम्‍हपूरी वनविभागाचे कार्यक्षेत्र डिस्‍पर्सल क्षेत्रात मोडत असल्‍याने सदर क्षेत्र हे वन व वन्‍यजीवांच्‍या बाबतीत अतिशय समृध्‍द आहे. सदर क्षेत्रात मोठया प्रमाणावर गावे वनालगत वसलेली असल्‍याने सातत्‍याने ब्रम्‍हपूरी वनविभागात मानव-वन्‍यप्राणी संघर्षाच्‍या घटना घडत आहेत. यामध्‍ये मनुष्‍यहानी, मनुष्‍य जखमी, पशुधन हानी, पशुधन जखमी, शेतपीक नुकसानाची प्रकरणे मोठया प्रमाणावर आहे. परिणामी स्‍थानिक नागरिकांमध्‍ये असंतोष वाढत आहे. मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याकरिता वनालगतच्‍या गावांमधील लोकांचे वनावरील अवलंबत्‍व कमी करणे आवश्‍यक आहे. याकरिता डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत गावांची निवड करताना भ्रमण मार्गातील गावांची निवड करण्‍यात आलेली आहे. याबाबत कायमस्‍वरूपी उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने सदर ६२ गावांसाठी प्रती गाव २५ लक्ष रूपये असा एकूण १५ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर व वितरीत करण्‍यात आला आहे.या ६२ गावांमध्‍ये ब्रम्‍हपूरी वनविभागाअंतर्गत नागभीड तालुक्‍यातील बनवाही माल, डोंगरगांव, तिवर्ला तूकूम, खडकी, कान्‍पा, विलम, म्‍हसली, बिकली, कसर्ला, कोरंबी, पेंढरी, नवखळा, रेंगातूर, कुनघाडा चक, कोदेपार, वासाळा मक्‍ता, मिंडाळा, कोसंबी गवळी, वासाळा मेंढा, कन्‍हाळगांव, वलनी, सावर्ला, उमरगांव, खरकाडा, राजोली बोंड, पारडी, सोनूर्ली, नवानगर, येनोली कोट, बाळापूर, गोविंदपूर, सोनापूर, येनोली माल, वैजापूर, कोजबी माल, नांदेड, झाडबोरी, बोडधा, लोहारा, रामपूर, सावरगांव, उपरपेठ तसेच ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील मरारमेंढा, दिघोरी, सावरदंड चक, बरडकिन्‍ही, तळोधी खुर्द, रानबोथली, चक बोथली, गवर्ला चक, विकासनगर, कोरेगांव रिठ, रामपुरी, बेलदाटी, मुडझा, आवळगांव, कोसंबी, पवनपार, सायगांव, एकारा, चिकटबोदरा, बोद्रा या गावांचा समावेश आहे

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026