• Home
  • राजकीय
  • अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश चोपडज मुस्लिम दफणभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर
Image

अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश चोपडज मुस्लिम दफणभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर

प्रतिनिधी- फिरोज भालदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाचे तालुका प्रसिद्ध प्रमुख अजर तांबोळी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या कामासाठी पुन्हा एकदा तत्परता दाखवून संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनानुसार निधी मंजूर करून आणला . बारामती तालुक्यातील चोपडज गावचे बारामती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रसिद्ध प्रमुख बारामती तालुका आणि अंजुमन इस्लाम चोपडज अध्यक्ष अजर तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश आले.

चोपडज मुस्लिम दफणभूमीसाठी पुन्हा एकदा दहा लाख रुपयांचा निधी मंजूर तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर व सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप व चोपडज ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य यांच्या सहकार्याने माननीय अजित दादा पवार यांनी चोपडज मुस्लिम दफनभूमीसाठी दहा लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर केलेले आहे . त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने अजित दादा पवार यांचे मनापासून आभार.

अजर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली चोपडज मुस्लिम समाजाचा विकासामध्ये अगदी कमी वेळात फार बदल होत असून येथून पुढेही राजकारण करत असताना समाजकारण ही असच चालू ठेवून बारामतीा तालुक्यातील काही भागात मुस्लीम समाजासाठी ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यासाठी अजर तांबोळी सातत्याने कार्य करत राहतील.

तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असून ते काम कसे पूर्णत्वाकडे जाईल याची दक्षता घेतली जाईल . विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात बारामती तालुक्यातील विकासाची गंगा वाहत असताना कोणता समाज विकासापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून काम करत असल्याने आणखी काही लोक उपयोगी कामे करता येथील त्यासाठी सतत तत्पर राहणार असे बारामती तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रसिद्ध प्रमुख अजर तांबोळी यांनी सांगितले. यावेळी गावातील ग्रामस्थांकडून अजर तांबोळी यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या .

Releated Posts

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025

निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.

 संपादक मधुकर बनसोडे.  नींबूत ग्रामपंचायत साठी पहिल्यांदाच निवडला जाणार जनतेतून सरपंच  नींबूत ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही…

ByBymnewsmarathi Apr 28, 2025