मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मुलगा सोफ्यावर मृतावस्थेत तर वडील स्नानगृहात विवस्त्र……नागपुरातील गुलमोहरनगरात अजब….

mnewsmarathi 02 Jun 2024 1 मिनिट वाचन 9,630 वाचन

प्रतिनिधी

नागपूर महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या मुलाचा घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिवदास भेंडे (७०), हरीश भेंडे (३९, रा. गुलमोहरनगर) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. शिवदास यांचा मृतदेह विवस्त्र आढळल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवदास भेंडे हे महापालिका कार्यालयात निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना चार मुले आहेत. त्यापैकी एक आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. दुसऱ्याचा मृत्यू झाला तर तिसरा मुलगा कापसीला राहतो. हरीश कुठलाच कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे लग्नही जुळत नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापलेक दोघेही दारू प्यायचे. आज सकाळी शेजाऱ्यांना भेंडे यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी शिवदास यांचा कापसीला राहणारा मुलगा रोशन भेंडे याला माहिती दिली. रोशन घरी पोहोचला व त्याने घर उघडून बघितले असता हरीशचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या स्थितीत तर वडील शिवदास हे बाथरुममध्ये विवस्त्र पडून होते. शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कळमना पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, सहायक निरीक्षक दंडवते यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi