• Home
  • क्राईम
  • बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
Image

बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक

प्रतिनिधी

शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. कल्याणीनगर अपघाताची घटना मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या बेपर्वाईमुळे घडली होती. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर अष्टापूर परिसरात शोककळा पसरली.

प्रवीण सुनील पाटोळे (वय २८) आणि राजवीर प्रवीण पाटोळे (वय सहा दोघे रा. अष्टापूर, ता. हवेली, नगर रस्ता ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वार यश शेखावत (वय २१ रा. न्हावी सांडस फाटा, ता. हवेली, नगर रस्ता) गंभीर जखमी झाला होता. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान यश शेखावत याचा मृत्यू झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली. याबाबत अक्षय पाटोळे (वय २९ ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर शुक्रवारी (३१ मे) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी निघाले होते. यवत परिसरातील राहू गावाकडून अष्टापूरकडे भरधाव वेगाने दुचाकीस्वार यश शेखावत निघाला होता. दुचाकीस्वार शेखावतने समोरुन येणारे दुचाकीस्वार प्रवीण यांना धडक दिली. प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार शेखावत गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच दुचाकीस्वार प्रवीण आणि त्यांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेखावतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.

अपघातात प्रवीण आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा राजवीर यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अष्टापूर परिसरात शोककळा पसरली. नगर रस्ता, सोलापूर रस्ता परिसरात भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026