• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात वाहतूक नियमांविषयी जाणीव जागृती
Image

काकडे महाविद्यालयात वाहतूक नियमांविषयी जाणीव जागृती

प्रतिनिधी.

सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालय व महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ,सचिव श्री सतीशराव लकडे, महालक्ष्मी ड्रायव्हिंग स्कूल चे मॅनेजर हेमंत लोंढे. व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.सुजाता भोईटे, श्री शिवाजी काकडे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी सर्वांचे स्वागत केले, तसेच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपल्या हातून कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी.
यावेळी अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांनी आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त असणे गरजेचे आहे. तसेच कोणासाठी थांबायचं नाही आणि कोणाला थांबायला लावायचं नाही आणि आयुष्यामध्ये चुकायचे नाही आणि सॉरी म्हणायची वेळच येणार नाही असं जीवन जगलं पाहिजे. तसेच माफ करण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये बाळगणे गरजेचे आहे.
यावेळी या कार्यशाळेचे प्रमुख श्री. हेमंत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमा विषयी व्हिडिओ ऑडिओ माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तराज जगताप यांनी केले व आभार पर्यवेक्षक राहुल गोलांदे यांनी मानले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026