• Home
  • माझा जिल्हा
  • जुबिलंट कंपनी  व ग्रामपंचायत निंबुत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
Image

जुबिलंट कंपनी  व ग्रामपंचायत निंबुत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी.

खरंतर कोविड ने वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे वृक्ष जगवले पाहिजेत हे 2019 मध्ये दाखवून दिलं आहे त्याच अनुषंगाने नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणामध्ये जवळपास दहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या अनेक महिन्याभरापासून निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविले जात आहेत आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जुबिलंट कंपनीचे इसाक मुजावर साहेब, ढगे साहेब, सायली मॅडम, निंबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, नंदकुमार काकडे, ग्रामसेवक काळभोर, क्लार्क भाऊसो कोळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, मुख्याध्यापक बालगुडे मॅडम, शेंडकर मॅडम, अनपट सर आदी मान्यवर उपस्थित होते, लावलेली सर्व झाडे भविष्यात त्याचं वटवृक्षात रूपांतर आम्ही करू असे आश्वासन अनपट सर यांनी दिले.
तर इसाक मुजावर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कंपनी नेहमीच चांगल्या उपक्रमांमध्ये शाळेच्या बरोबर असेल असे आश्वस्त केले.

Releated Posts

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026