• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चुप.! 
Image

सोमेश्वरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चुप.! 

 संपादक मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अद्याप कोणावरतीही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सभासदांमधून नाराजी दिसत आहे.

 सोमेश्वर कारखान्याने चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये. लेबर ऑफिसर निंबाळकर, व कर्मचारी साळुंखे, हे दोन इसम प्रथम दर्शनी दोषी असल्याचे समजते?. मात्र संबंधित ठेकेदारावरती आद्यपही कोणत्या प्रकारचा ठपका लावल्याचे दिसत नाही. संबंधित ठेकेदाराला  जाणीवपूर्वक या प्रकरणांमधून वाचवलं जात आहे का? हितसंबंध जोपासण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारावरती मेहरबानी केली जात आहे की काय? अशा चर्चा सभासदांमधून होत आहे

 सहकारी साखर कारखाने निपक्षपाती पणे चालवायचे असतील तर सहकाराचे कुरण होऊ द्यायचे नसेल तर अशा विकृत विचारांच्या ( लबाड्या करणाऱ्या ) लोकांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे अशी भावना सभासदांमधून व्यक्त होत आहे. आद्यपही गुन्हे दाखल न केल्यामुळे तारीख पे तारीख सध्या तरी एवढेच चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून सोमेश्वरच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

 कारखान्यामार्फत चौकशी समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीच्या आलेल्या अहवालानुसार जवळपास 54 लाख रुपयाचा अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले होते तरीही संबंधित व्यक्तींवरती अद्यापही गुन्हे का दाखल केले नाहीत? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

 संबंधित ठेकेदाराला वाचवण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांचा आर्थिक बळी देऊ नका अशी चर्चा सध्या सोमेश्वर परिसरामधील सभासदांमधून मोठ्या प्रमाणात होत आहेत.

Releated Posts

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026

नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बारामती मध्ये तीव्र निषेध

प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या हृदयद्रावक…

ByBymnewsmarathi May 4, 2026

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026