मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला जाग येणार का?

mnewsmarathi 29 Apr 2025 1 मिनिट वाचन 9,789 वाचन

 संपादक मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी अहवालातून सिद्ध झाली मात्र अद्यापही सोमेश्वरच्या कारभाऱ्यांकडून दोषींवरती कोणतीही कायदेशीर कारवाई केल्याचे दिसत नाही. सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळा झोपेच सोंग घेऊन या प्रकरणांमधून नक्की कोणाला वाचवण्याचे प्रयत्न करत आहे? कारखान्याने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास हा आर्थिक घोटाळा 54 लाखापेक्षा जास्त आहे तरीही संबंधितांवरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया का केली नाही असं संतप्त सवाल ऊस उत्पादक सभासदांमधून केला जात आहे.

 या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केल्यास

 दुसऱ्याच कोणत्यातरी मास्टर माईंड चे नाव पुढे येईल? या भीतीने चेअरमन संचालक मंडळ या प्रकरणाकडे वेळकाढू पणा करून डोळे झाक करत आहे का? अशा देखील चर्चा सोमेश्वर परिसरामध्ये रंगू लागल्या आहेत.

 अनेक पुरस्काराने सन्मानित केलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती आर्थिक गैरव्यवहार केलेल्या लोकांची पाठराखण करून त्यांना पाठीशी घातले जाणार का? हे पाहणे औचितत्याचे ठरणार आहे.

 खरंतर सभासदांच्या एकजुटीची आता गरज असून सभासदांनीच सभासदांसाठी एक मोठा लढा उभा करून सोमेश्वर चा सभासद किती जागृत आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे.? सभासदांनीच निवडून दिलेल्या चेअरमन संचालक मंडळावर ती दबाव आणून चेअरमन व संचालक मंडळ यांना सभासदांनीच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. अशा देखील चर्चा काही सभासदांमधून होत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi