• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन.
Image

बारामती ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन.

प्रतिनिधी –

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणाचीही मागणी नसताना लाडकी बहीण योजना काढली. या योजनेमार्फत महिलांना दरमहा १५०० देण्यात येतात अशा प्रकारच्या योजना काढल्याने साहजिकच सरकारवर आर्थिक बोजा येणार मुळातच या योजनेसंदर्भात कोणतेही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने व या योजनेसाठी एवढा मोठा निधीची तरतूद कुठून करणार याबाबतचे नियोजन शून्य असल्याने ही योजना चालवण्यासाठी सरकारला वर लोड येत आहे. ही योजना चालू करताना सरकार मधील नेत्यांकडून सांगण्यात येत होते कि ही योजने चालवण्यासाठी आमच्या कडे खूप निधी आहे व तशी आम्ही तरतूद केली आहे परंतु ही योजना चालवण्यासाठी सरकार कडे निधी नसल्याचे समोर आले आहे याचे कारण इतर लोकांच्या हक्काचे निधी सरकारला वळवावे लागत आहेत. दिनांक २ मे २०२५ रोजी शासन निर्णय क्र. मवबा-२०२५/प्र.क्र. ८३/कार्या या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी समाज कल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा ४१०.३० कोटी (अक्षरी ४१० कोटी तीस लाख रुपये) इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बाल विकास विभागास वळवला आहे.

यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीने सरकारचा जाहीर निषेध केला आहे. कारण अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांच्या हक्काचा निधी, त्यांचे जीवनमान सुधारणार निधी, त्यांची दर्जा वाढवणारा निधी, शिक्षणासाठी खर्च करावयाचा निधी, अत्याचार ग्रस्त लोकांचे पुनर्वसन करणारा निधी, घरकुलासाठी वापरणारा निधी, व्यवसाय सुरू करण्यासाठीचा निधी, भूमिहीन शेतकऱ्यांसाठीचा निधी व इतर सामाजिक न्याय देण्यासाठी वापरावयाचे निधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वळवून बेकायदेशीर कृत्य केले आहे. अशाप्रकारे निधी वळवू शकत नसतानाही सामाजिक न्यायाचा निधी वळून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांवर अन्याय केला असल्याच्या निषेधार्थ तसेच हा निधी परत करावा. अशाप्रकारे अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचा हक्काचा निधी वळवून नये यासाठी बजेटचा कायदा करावा.

लाडक्या बहीण योजनेसाठी स्वातंत्र्य तरतूद करणे, सामाजिक न्यायाचा निधी बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात व त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या मागण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने दिनांक ८ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी, बारामती येथील घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष, मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, उपाध्यक्ष गणेश थोरात, महासचिव प्रतीक चव्हाण, सहसचिव कृष्णा साळुंके, बारामती तालुकाध्यक्ष अनुप मोरे, इंदापूर तालुका अध्यक्ष, कीर्तीकुमार वाघमारे, दौंड तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, जितेंद्र कवडे, किशोर मोरे, सागर गवळी, मंगेश सोनवणे, जितेंद्र जगताप, प्रीतम कांबळे, अण्णा घोडके, आर्यन साळवे, आसिफ शेख, शिवाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026