मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

कोरेगाव येथे श्री. सागर व सौ. वृषाली भोसले यांच्या सुपुत्र शिवेंद्र याचे शाही नामकरण सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक थाटात पार पडला.

mnewsmarathi 09 May 2025 1 मिनिट वाचन 9,615 वाचन

प्रतिनिधी

शिवेंद्रच्या शाही नामकरण सोहळ्याला हजारोंच्या उपस्थितीने ऐतिहासिक ठरला नामकरण सोहळा. , सुमन गार्डन मंगल कार्यालय, कोरेगाव येथे श्री. सागर व सौ. वृषाली भोसले यांच्या सुपुत्र शिवेंद्र याचे शाही नामकरण सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक थाटात पार पडला.

कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण म्हणजे श्री डान्स अकॅडमी, वाई यांच्यातर्फे सादर केलेला शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परंपरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात आली. संपूर्ण सोहळ्याची थीम शिवकालीन ठेवण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रम ऐतिहासिक व प्रेरणादायक ठरला.

सर्व उपस्थित पै पाहुण्यांनी बाळ शिवेंद्र ला शुभाशीर्वाद देऊन त्याला जीवनभर सुख, समृद्धी आणि यश मिळवावे, अशी आशा व्यक्त केली. विशेषतः प्रत्येक महिला पाहुण्यांना भोसले परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक रिटर्न गिफ्ट देण्यात आले.

कार्यक्रमात दोन्ही कुटुंबातील आजोबा व आजी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. बाळाचे आजोबा व आजी म्हणून श्री. चंद्रकांत कृष्णराव भोसले व सौ. जयश्री चंद्रकांत भोसले तसेच दुसरे आजोबा व आजी म्हणून शिवाजीराव पिसाळ व सौ. जयमाला पिसाळ यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात पै पाहुण्यांच्या उपस्थितीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे थोडक्यात प्रतिनिधित्व होतं, यामध्ये आमदार श्री व सौ. शशिकांत शिंदे, प्रतिभाताई पाटील, प्रीती घार्गै, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, मुंबई महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, निंबुत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. उदयसिंह काकडे देशमुख, तसेच माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक यांचे पुतणे श्री. विवेकराव नाईक यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अखेरीस पारंपरिक शाही जेवण आणि प्रत्येक पाहुण्याला दिलेले रिटर्न गिफ्ट्स या सर्व बाबींनी शिवेंद्रच्या नामकरण सोहळ्याला एक संस्मरणीय ठराविक व ऐतिहासिक ठरला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi