मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 14 May 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 14, 2025 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ, जिल्हा परिषदेचे सहा. विशेष अधिकारी श्री. बी. दरवडे, तहसिलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर, निवृत्त कर्नल प्रमोद दहीतुले तसेच इतर कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील २५० हून अधिक वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, सेवारत, सेवानिवृत्त अधिकारी, सेवारत, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी उपस्थित होते.

या सैनिक दरबारासाठी जिल्ह्यातून ९० अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जावर जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन अर्जदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे आलेले अर्ज कार्यवाहीसाठी पाठवून त्यांचा अहवाल घेण्याबाबत आदेश दिले. पुढील सैनिक दरबार ३० जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल तसेच आजच्या दरबारातील अर्जांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी उपस्थितांना सैनिक कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची माहिती दिली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख