• Home
  • क्राईम
  • अवैध सावकारी चार जणांना भोवली, दोन प्रकरणांत गुन्हे दाखल
Image

अवैध सावकारी चार जणांना भोवली, दोन प्रकरणांत गुन्हे दाखल

प्रतिनिधी

अवैध सावकारी करणे चार जणांना चांगलेच भावले असून या दोन वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावकारी परवाना नसताना अवैधरित्या हा व्यवसाय चालवला. या प्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली.

अवैध सावकारी प्रकरणी दिगांबर व संजय गोरले यांनी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. यामध्ये रमेश कोल्हे, सुरेश कोल्हे व भगवान काटोले यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पंचासमक्ष व पोलीस बंदोबस्तात २७ मार्च रोजी छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये बक्षीसपत्र एक, खरेदी खत छायाप्रती तीन, इसार पावती चार, धनादेश १३, पासबुक सहा, मुद्रांक एक, सातबारा नमुना पाच असे दस्तऐवज जप्त केले. सहाय्यक निबंधक (प्रशासन) अभयकुमार कटके यांनी चौकशी करून व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचा अहवाल दिला. त्यावरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम ३९ अन्वये खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात सुरेश वाघमारे यांच्या तक्रारीनुसार धनराज जामोदे याच्याकडे छापा टाकण्यात आला. यामध्ये बक्षीसपत्र दोन, खरेदीखत ३४, इसारपावती तीन, उसनवारपावती एक, हस्तांतरणपत्र एक, मुद्रांक १३६, धनादेश एक व पासबुक आठ दस्तऐवज जप्त केले. तेल्हारा येथे आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास तक्रार आवश्यक पुराव्यासह उपनिबंधक सहाय्यक सहकारी संस्था कार्यालयात दाखल करावी. नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांनी केले.

Releated Posts

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ…

ByBymnewsmarathi Jan 5, 2026

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर…

ByBymnewsmarathi Jan 1, 2026