• Home
  • माझा जिल्हा
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु
Image

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु

प्रतिनिधी.

बारामती, दि.२: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामती तालुक्यातील नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्याकरिता वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडद, १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांची स्थापना अशा विविध माध्यमातून बारामती तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे.

वैद्यकीय मदत कक्ष, पहिला मजला, कृषी भवन, नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथे स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे नागरिकांना त्यांच्या भागातच आरोग्य विषयक अडचणीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. परिणामी आरोग्यविषयक मदत किंवा मार्गदर्शनाकरिता
मुंबई येथे जाण्या-येण्याचा वेळ वाचण्यासोबतच त्यांची आर्थिक बचतही होणार आहे.

नागरिकांनी आरोग्याबाबत कोणतीही वैद्यकीय अडचण, मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक नितीन हाटे यांच्या ९८१९६३८९०८, ७९७७४७७३८२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026