मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 December 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विनापरवाना विजयी रॅली काढणे पडले महागात.पाच जणांवर गुन्हा दाखल

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
December 24, 2022 1 मिनिट वाचन 8,516 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

मोरगाव : दिनांक 20/12/2022 रोजी दुपारी 01/00 वाजता मोरगाव गावचे हद्दीत ता बारामती जि पुणे येथे आरोपी :- 1) पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे 2) निलेश हरिभाउ केदारी 3) अक्षय यशवंत तावरे 4) सुरज प्रल्हाद तावरे 5) समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती जि पुणे

यांनी ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रँली काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळान करुन विनापरवाना डि.जे ची मिरवणुकीत वापर करुन व मयुरेश्वर मंदिरा समोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नितीमत्ता यास धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून मा जिल्हाधिकारी सो पुणे यांचे

मनाई आदेशाचे भंग केला.वगैरे मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हाचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा. JMFC कोर्ट बारामती येथे रवाना केला असुन पुढील तपास सफौ वाघोले हे करीत आहेत. सद्या परिस्थिती शांतता आहे

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख