• Home
  • माझा जिल्हा
  • जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ
Image

जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाचा वाणेवाडी येथे शुभारंभ

प्रतिनिधी.

शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत-उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख

बारामती, दि.२०: शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जिथे उस तिथे बांधावर नारळ लागवड” तसेच जलतारा योजनेच्या माध्यमातून नारळ लागवडीचा शुभारंभ ग्रामपंचायत वाणेवाडी येथे शुक्रवारी करण्यात आला.

यावेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख यांच्या हस्ते नारळ लागवड करण्यात आली; यावेळी त्यांनी लाभार्थींना नारळ लागवड व जलतारा योजनेबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे शाश्वत शेती, पाणलोट विकास तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, सरपंच गीतांजली जगताप, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी विजय चव्हाण, कृषी पर्यवेक्षक भारत माने, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी मित्र, तालुका समन्वयक, ग्रामस्थ तसेच सर्व मनरेगा कर्मचारी उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026