• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! होळ गावचा कारभार तरुण पिढीकडे सुपूर्त ; होळ गावच्या सरपंच पदी सूरज कांबळे यांची बिनविरोध निवड .
Image

बारामती ! होळ गावचा कारभार तरुण पिढीकडे सुपूर्त ; होळ गावच्या सरपंच पदी सूरज कांबळे यांची बिनविरोध निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील होळ गावच्या सरपंच पदी सुरज कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तरुण पिढीकडे गावच कारभार जावा व त्यांच्याकडून गावचा विकास व्हावा यासाठी सूरज कांबळे यांना सरपंच पद हे संभाजीनाना होळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले . या पदासाठी आलेल्या निवडणूक प्रक्रियेत फक्त सुरज कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड बिनविरोध करण्यात आली. माजी सरपंच उज्वला संतोष होळकर यांनी आपला राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते हे पद भरण्यासाठी सूरज कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली.

या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत माजी सरपंच , सदस्य, उपसरपंच , ग्रामसेवक रमेश लडकत,
तलाठी स्नेहा जगताप, आजी माझी पदाधिकारी , ज्येष्ठ नागरिक , युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन पारवे यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. होळ गावात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमध्ये सुरज कांबळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सुरज कांबळे म्हणाले, गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. संभाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली होळ गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे.
गावात पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, शिक्षण, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, तसेच महिलांच्या स्वयंसहायता गटांना बळकटी देणे या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026