मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 31 October 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनतर्फे “एकता मॅरेथॉन” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 31, 2025 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

“एक भारत – श्रेष्ठ भारत” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनतर्फे भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजन एपीआय नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल साबळे व त्यांच्या टीम कडून करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय नागनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून, परिसरातील शेकडो युवक, महिला आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गावातील रस्त्यांवर “भारत माता की जय” आणि “एकता जिंदाबाद” या घोषणा घुमत होत्या.

स्पर्धेचा उद्देश — राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचवणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि सरदार पटेल यांच्या अद्वितीय कार्याचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत “पोलिस प्रशासनाने समाजाशी जोडलेले हे उपक्रम लोकाभिमुख आहेत” अशी भावना व्यक्त केली.

एपीआय नागनाथ पाटील यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत म्हटले की,

एकतेच्या बळावरच देशाची प्रगती शक्य आहे; तरुणाईने देशप्रेम आणि शिस्तीचा आदर्श घालावा.

या मॅरेथॉनमुळे युवकांमध्ये देशभक्ती, सामाजिक एकता आणि आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याचे दिसून आले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख