दौंड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आगामी निवडणूक प्रक्रियेला पदाधिकाऱ्याकडून वेग

Uncategorized

 

शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर यांच्या सूचनेवरून काल दौंड विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हाप्रमुख संजुभाऊ काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुक अनुषंगाने मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली

महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत असताना पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा क्षेत्रामध्ये पंचायत समिती आणि दौंड शहरांमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून जास्तीत जास्त उमेदवार उभा करून चांगल्या पद्धतीने निवडणूक लढण्याच्या नियोजनासाठी पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस दौंड या ठिकाणी इच्छुकांनी गर्दी करत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्य संघटक श्री अतुलराजे नागरे यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क करून उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये बळ देण्यासाठी उत्साह पूर्वक आश्वासन मिळाले आणि बैठकीचे वातावरण आनंददायी झाले
या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय काळे, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, तालुकाप्रमुख शंकर शितोळे, शहर प्रमुख आनंद पळसे, आरोग्य सेनेचे तालुकाध्यक्ष डॉ प्रमोद रंधवे युवा सेनेचे किरण वाळुंजकर अमोल भागवत व इतर पदाधिकारी संतोष जगताप,रमाकांत निवगुणे, देविदास धुमाळ,आमोळ काळे, विक्रम इंगोले, नामदेव राहिंज, मच्छिंद्र ठोंबरे, दीपक पाटील, शिवाजी साळुंखे, मंगेश वाघ, दत्ता राऊत, इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते