अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणारी आंतरराज्य टोळी केली जेरबंद

क्राईम

प्रतिनिधी- अक्षय थोरात

२९,९८,५००/- रुपये किंमतीचा १०० किलो गांजा व चार चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त

दिनांक ०७/११/२०२५ रोजी पहाटे ०५/०० वा. दरम्यान वालचंदनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, बावडा ते बारामती (बी.के.बी.एन) रोडने एक चार चाकी होंडा सिटी गाडी तिचा क्रमांक एम. एच १२ डी. वाय २०१२ यामधुन काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी गांजा बाळगुन त्याची वाहतुक करत असुन तो अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी बारामती येथे घेवुन जात आहेत खात्रीशीर माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. राजकुमार डुणगे यांनी सदर मिळालेल्या गोपनीय बातमीची मा. पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण व मा. अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती विभाग यांना देवुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, बारामती उपविभाग यांच्याकडे सदर इसमांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त करुन घेत कारवाईची संपूर्ण योजनाबध्द आखणी केली. त्यानंतर तातडीने बावडा ते बारामती (बी. के. बी.एन) रोडवर ठिकठिकाणी पोलीसांचा सापळा रचुन मिळालेल्या गोपनीय माहिती मधील चार चाकी वाहनाची माहिती घेत असताना सदर चार चाकी गाडी ही कळंब, ता. इंदापुर येथे दिसुन आली. त्यावेळी सदर गाडीच्या चालकास पोलीस पाठलाग करत आहेत याची चाहुल लागल्याने सदर गाडी चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने पळविल्यानंतर त्या गाडीस सिनेमा स्टाईलने कळंब गावातील डी.पी चौकामध्ये आडवुन त्या गाडीमधील तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यावेळी सदर चार चाकी गाडीची पाहणी करत असताना त्या गाडीच्या डिक्की मध्ये प्लॉस्टिकच्या दोन गोण्यामध्ये २४,९८,५००/- रुपये किंमतीचा ९९.९४ किलो गांजा तसेच ५ लाख रुपये किंमतीचे चार चाकी वाहन असा एकुण २९,९८,५००/- किंमतीचा मुद्देमाल हा आमचे तसेच सक्षम अधिकारी अविनाश डोईफोडे नायब तहसिलदार तसेच दोन शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदर ताब्यात घेतलेल्या इसमाकडे त्यांचे नाव पत्ता विचारत असताना त्यांनी त्यांचे नावे १) फिरोज अजिज बागवान, वय ३६ वर्षे, रा. कसबा बारामती, पुणे, २) प्रदीप बाळासो गायकवाड, यय २८ वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि.पुणे, ३) मंगेश ज्ञानदेव राऊत, वय २९ वर्षे, रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे असे सांगुन त्यांनी सदरचा अंमली पदार्थ गांजा त्यांचे इतर ०३ साथिदार यांचे मदतीने हैद्राबाद येथुन घेवुन विक्रीसाठी बारामती येथे आणत असल्याची माहिती दिली. सदर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोहवा गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नंबर ३६३/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन मिळून आलेले तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायालय साो, इंदापुर यांनी दिनांक १२/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन सदर गुन्हयाचा सखोल तपास सपोनि

राजकुमार डुणगे हे करत असुन तपासा दरम्यान फरारी आरोपी अश्रम अजिज सय्यद, वय २९ वर्षे, रा. निरा वागज, ता. बारामती, जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हयाचा तपास सुरू असुन अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणे यामध्ये आंतर राज्य टोळीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग, मा. श्री. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. श्री. डॉ. सुर्दशन राठोड सो.. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर सो, पोलीस निरीक्षक स्था. गु.शाख यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुणगे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार गणेश काटकर, उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने, ओंकार कांबळे यांनी केली आहे.