• Home
  • माझा जिल्हा
  • निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न
Image

निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

प्रतिनिधी.

पुणे, दि. १२: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या जिल्हा दरसूचीच्या दर निश्चितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक खर्चाच्या वापरण्यात आलेली दरसूची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकात वापरण्यास सहमती दर्शविण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नोडल अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल पवार, कोषागार अधिकारी देवराम शेळके यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकाकरिता आजच्या बैठकीत मान्य करण्यात आलेली दरसूची राजकीय पक्षांन कळविण्यात येईल. या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.

आज सकाळी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने नियुक्त संबंधित विषयांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आढावा घेवून त्यांना सूचना दिल्या.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026