अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली
1 min read

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी

अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार ओळखपत्र आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्डांवर नाव, फोटो किंवा क्रमांक अशी कोणतीही माहिती छापलेली नाही.

स्थानिकांच्या माहितीनुसार हे कार्ड साफसफाईदरम्यान आढळून आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या असून अनेकांनी ही घटना निवडणूक प्रक्रियेवरील गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे म्हटले आहे.

 

तथापि, निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारकडून अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते ही कार्ड कदाचित प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी नमुना कार्डे किंवा अपूर्ण स्वरूपातील फॉर्मेट असण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील अनियमिततेवर नुकतेच राजकीय वादंग सुरु असतानाच हे कार्ड सापडण्याचे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. अनेक नागरिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सध्या प्रशासनाकडून अधिकृत चौकशीची प्रतीक्षा आहे.