मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

25 वर्षानंतर पुन्हा भरला कवठे येथे सातवीच्या वर्ग

mnewsmarathi 28 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,318 वाचन

प्रतिनिधी

कवठे दि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे येथे सण 1996 97 साली इयत्ता सातवी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच वाई सुरूर रस्त्यावरील स्वराज गार्डन हॉटेल मध्ये दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी पार पडलाकार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत राजेंद्र जगताप व नानासाहेब डेरे यांनी केले प्रथमतः सर्वांनी एकमेकांना स्वतःचा परिचय करून दिला उपस्थित असणारे शिक्षक सौ छाया कदम व श्री जयवंत कदम यांचा सत्कार धनंजय ओझर्डेकर, गिरीश डेरे आणि वैशाली पवार यांनी सर्व उपस्थितयांच्या वतीने केला. यावेळी विद्यार्थी करुणा डेरे, राजेंद्र जगताप, गणेश गायकवाड, पल्लवी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा देऊन पुन्हा एकदा शाळेला वर्ग 25 वर्षानंतर भरल्याची प्रचिती दिली.श्री कदम सरांनी 25 वर्षांपूर्वीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या विविध शालेय प्रसंगातील आठवणी काढून वातावरण आनंददायी तसेच संवेदनशील बनवले तसेच आपले जीवन इतरांच्या सहकार्यासाठी करून स्वतः आनंदी व निरोगी व स्वतःच्या मुलांना सुसंस्कृतीत करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले सौ छाया कदम मॅडम यांनी मैत्रीच्या संबंध स्नेहसंबंध असेच जपण्याचा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले बॅचमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला स्नेहमेळाव्याचे आयोजन अभिजीत डेरे करुणा डेरे गणेश गायकवाड पल्लवी जगताप यांनी केले. स्नेह मेळाव्यासाठी सुप्रिया पोळ करुणा डेरे पल्लवी जगताप स्वाती पोळ रूपाली पोळ वैशाली डेरे सविता वाघमारे वैशाली पवार रुक्मिणी खुडे दिपाली पोळ दिपाली डेरे आशा डेरे स्वाती डेरे अर्चना डेरे गिरीश डेरे नानासाहेब डेरे निलेश पोळ गणेश गायकवाड अशोक चव्हाण किरण जगताप राजेंद्र जगताप निलेश शिंदे दीपक कदम अशोक चव्हाण तानाजी चव्हाण निलेश शिंदे गाणे नितीन डेरे अभिजीत डेरे धनंजय ओझर्डेकर गिरीश डेरे इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालन गिरीश डेरे यांनी केले तर आभार अभिजीत डेरे यांनी मानलेप्रतिनिधि संतोष चव्हाण वाई

लेखक

mnewsmarathi

M News Marathi