मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निंबूत येथे क्षेत्राच्या वादावरून एकास बेदम मारहान बापलेकावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

mnewsmarathi 01 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,879 वाचन


प्रतिनिधी-फिरोज भालदार
निंबूत ता. बारामती जि.पुणे येथे दि. 14. 12. 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निंबूत येथील शेत जमीन गट नंबर 691 मधील 16 आर क्षेत्रामध्ये नारायण भाऊसो काकडे यांचे क्षेत्र मोहसिन राजू सय्यद रा. निंबुत ता. बारामती जि. पुणे याने काकडे यांचे क्षेत्र खंडाने करायला घेतले होते.

त्या क्षेत्रामध्ये रमजान गुलाब सय्यद व रजत रमजान सय्यद दोन्ही रा.नींबूत ता. बारामती हे दोघेजण मोहसीन याने खंडाने घेतलेल्या क्षेत्रांमध्ये मशागत करीत असताना मोहसीन याने रमजान व रजत यांना तुम्ही शेतात मशागत करू नका हे क्षेत्र मी करत आहे असे समजावून सांगत असताना तुम्ही दोघांनी आजपासून या क्षेत्रात पाय ठेवायचा नाही असे म्हणल्याच्या कारणावरून रमजान गुलाब सय्यद याने शेतात पडलेला दगड हातात घेऊन मोहसीन याच्या कपाळावर डाव्या बाजूस मारून दुखापात केली व रजत याने मोहसीन ला हाताने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली .यावरून मोहसीन राजू सय्यद याने करंजे पोलीस दूरशेत्र मध्ये फिर्याद दाखल केली . यावरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये करंजीपूल ओ.पी येथून आलेल्या गुन्हा रजिस्टर दाखल करून घेतला आहे. तरी पुढिल तपास पो .हवा खेडकर हे करीत आहे

लेखक

mnewsmarathi

M News Marathi