• Home
  • ताज्या बातम्या
  • सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांचा वाढदिवस मित्रपरिवार यांनी केला उत्साहात साजरा.
Image

सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांचा वाढदिवस मित्रपरिवार यांनी केला उत्साहात साजरा.

प्रतिनिधी.
सुखदेवराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करंजे, माळवाङी, जोशीवाङी, चौधरवाङी,मगरवाङी, देऊळवाङी, नाईकवाङी, चोपनवस्ती वाकी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
सुखदेवराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व खासदार सुनेत्रावहिनी पवार यांचा कव्हर फोटो आसलेल्या वह्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने वाटप करण्यात येते.यावेळी शाळेतील मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद व्दिगुणित झाला होता.लहान लहान चिमुकल्यांनी सुखदेवराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अतिशय सुंदर आसा उपक्रम सुखदेवराव शिंदे मित्रपरिवार फ्लेक्स बाजी व इतर खर्च टाळून राबवित आसतात.
यावेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, मगरवाङी गावच्या सरपंच सौ विनिता हगवणे, वाकी गावचे सरपंच किसन बोङरे,अनिल भंङलकर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर,अनिल हूंबरे,करंजे गावचे उपसरपंच विष्णू दगङे, बारामती ता.राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड,आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर, वाकी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोषराव जगताप, शिवराम जगताप,चौधरवाङी गावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पापळ,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी चेअरमन राजेंद्र भांङवलकर,संतोषराव भांङवलकर,पांडूरंग हूंबरे,पत्रकार विनोद गोलांङे,व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Releated Posts

जिद्द, संयम आणि कष्टांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र शरद लोणकर

सोरटेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र लोणकर यांचा संघर्षमय प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आर्थिक परिस्थिती…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

खांडज–बारामती रस्त्याची दुरवस्था; नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न

सहसंपादक अक्षय थोरात. खांडज गावातून थेट बारामती शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती तालुक्यात भारतीय पत्रकार संघाकडून पत्रकार दिन साजरा.

प्रतिनिधी. भारतीय पत्रकार संघ, बारामती तालुका यांच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा मोठ्या…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026