प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ होळकर यांच्या घराच्या शेजारील गुरांच्या गोठ्यातील लोखंडी जाळी तोडून 01 शेळी व 04 बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना करून घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहिती आधारे संशयित इसम 1. अजय उर्फ गोविंद सतीश होळकर राहणार मोहोळ तालुका बारामती जिल्हा पुणे 2. आर्यन सचिन माने, राहणार निरगुडवाडी सदोबाची वाडी तालुका बारामती जिल्हा पुणे 3. शिवभान उर्फ बंटी नंदकुमार घोडके राहणार वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन यांच्याकडे सखोल चौकशी केली असता यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना सदर गुन्ह्याचा तपास कमी अटक करून मा. न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यांच्याकडून तपासात होळ व सदोबाचीवाडी या परिसरातील चोरलेली एकूण 05 बोकड व गुन्ह्यात वापरलेल्या 02 मोटरसायकली अशा एकूण 1,15,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पोपट नाळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. अविनाश शिळमकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार पोपट नाळे, सागर चौधरी, हृदयनाथ देवकर , महेश पन्हाळे,पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस अंमलदार आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे यांनी मिळून केली.

















