प्रतिनिधी.
भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा किसान मोर्चा संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय काकडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी दिग्विजय काकडे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला. शेतकरी प्रश्न, ग्रामीण भागातील विकास, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची उपस्थितांनी विशेष दखल घेतली.
याप्रसंगी बोलताना दिग्विजय काकडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. “शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्षाच्या माध्यमातून प्रभावी भूमिका मांडली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी दिग्विजय काकडे यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण, तालुक्यातील दिग्गज मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.













