• Home
  • क्राईम
  • सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान
Image

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी

पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडाळे चौक परिसरात अडीचच्या सुमारास टोळक्याने बांबू आणि कोयत्याचा वापर करून तब्बल १५ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली.

या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस चव्हाण या तरुणाचा काही दिवसांपासून आरोपींसोबत वाद सुरू होता. बुधवारी मध्यरात्री टोळक्याने क्रिसला अडवून त्याच्याशी बाचाबाची केली. वाद वाढल्यानंतर टोळक्याने त्याला मारहाण केली. क्रिस तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. याचवेळी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. अचानक झालेल्या आरडाओरड आणि वाहन फोडण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिपक कदम याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. इतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शीचीही माहिती घेतली जात आहे.

पद्मावती परिसरात वाहन तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मे २०२५ मध्ये तळजाई वसाहतीत अल्पवयीन टोळक्याने चार वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Releated Posts

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ…

ByBymnewsmarathi Jan 5, 2026