प्रतिनिधी.
करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त झालेल्या पदी चेअरमन निवङ घेण्यात आली होती.
आज महेश शेंडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बारामती सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुङे यांनी त्यांची चेअरमनपदी निवङ जाहिर केली.
करंजे सोसायटीची स्थापना 1911 सालची आहे करंजे सोसायटीची वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपयांवर आहे.तसेच संस्थेचे स्वमालकीचे व्यावसायिक गाळे आहेत.
महेश शेंडकर यांची चेअरमनपदी निवङ झाल्याने अभिनंदन करण्यात येत आहे.
महेश शेंडकर प्रगतशील बागायतदार आहेत.संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी माजी चेअरमन निवृत्ती शेंडकर, शहाजीराव गायकवाड, अनिल गायकवाड, विध्यमान व्हाईसचेअरमन मच्छिंद्र शेंडकर,करंजेपूल मा सरपंच वैभव गायकवाड,शिवाजीराव शेंङकर,संचालक तानाजीराव गायकवाड,राहूल शेंडकर,शशिकांत गायकवाड,विठ्ठल गायकवाड,महेंद्र शेंडकर,रविंद्र गायकवाड,प्रकाश शेंडकर,कुसुम शेंडकर,मयुर शेंडकर संस्थेचे सचिव दिपक किसन शिर्के व क्लार्क सोमनाथ गायकवाड आदि उपस्थित होते.













