• Home
  • क्राईम
  • कोयता उगारून महिलेला जिवे मारण्याची धमकी देणा-यास केले जेरबंद
Image

कोयता उगारून महिलेला जिवे मारण्याची धमकी देणा-यास केले जेरबंद

प्रतिनिधी

जंगली महाराज रोडवरील जे. एम. कॉर्नर या खाऊ गल्लीमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणा-या महीलेवर तिथे आलेल्या टोळक्याने तत्कालीन झालेल्या वादावरून त्या महीलेवर कोयता उगारून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन त्या परिसरात दहशत निर्माण करून ते टोळके पसार झाले होते व त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०२/२०२३ भा.द.वि. कलम ५०६ (२), ५०४, १४३, १४७, १४९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ २५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) (३) आणि क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ असा गुन्हा दाखल करण्यात आला.

तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून सीसीटीव्ही कॅमेरे तपासून टोळक्यातील मुलांची ओळख पटविण्यात आली. व त्यानंतर त्यांचे ठावठिकाण्याबाबत गोपनीय रित्या माहीती प्राप्त करून,सातत्यपुर्ण तपास करून १) रणजित रघुनाथ रामगुडे, वय २० वर्ष, रा. विठठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी पाषाण पुणे २) रोहन गोरख सरक, वय १९ वर्ष, रा. विठठल मंदिराशेजारी, सुतार चाळ, सुतारवाडी पाषाण पुणे ३) विशाल शंकर सिंह वय १८ वर्ष, रा. ओमकार गणेश मंदिराजवळ, संगमवाडी पुणे ४) दोन विधीसंघर्षितीत बालके यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले. त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.

सदर आरोपी यांचे कडुन गुन्हयात वापरलेले चार लोखंडी कोयते आणि गुन्हयात वापरलेल्या चार दुचाकी गाड्या असा एकुण १,२५,०००/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा हा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, श्री. सन्दीप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री सतीश गोवेकर, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड़, सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, दिलीप नांगरे यांनी केलेली आहे.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026