• Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर मोरे यांचा उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव
Image

महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर मोरे यांचा उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव

प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रम.महाराष्ट्रातील तरूणांच्या करिअरला दिशा देण्याचे काम करिअर कट्टाकडुन होत आहे.करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन. दि.२५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर याठिकाणी पार पडला.या कार्यक्रमात गेली चार वर्ष करिअर कट्टामध्ये सातत्यपूर्ण काम करणारे,युथ आयकॉन रामेश्वर परमेश्वर मोरे यांची नुकतीच करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाल्याबद्दल मा.श्री.रविंद्र साठे(सभापती खादी ग्रामोद्योग, राज्यमंत्री दर्जा) यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

रामेश्वर मोरे हे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या संपर्कातून असुन त्यांनी विद्यार्थ्यांची साखळी करिअर कट्टाच्या माध्यमातून तयार केली आहे.महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा.यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. या सत्कार सोहळ्या प्रसंगी मा.डॉ.नामदेव भोसले (सहसचिव,मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन),मा.श्री.प्रफुल्ल पाठक(अध्यक्ष,सोलर सोसायटी ऑफ इंडिया),मा.श्री.सचिन इटकर(क्षेत्रीय संचालक,महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ),मा.श्री.मंदार फणसे(Editer News 18 lokmat) हे मान्यवर उपस्थित होते.या यशाबद्दल त्यांचे महाराष्ट्रभरातून अभिनंदन होत आहे.

Releated Posts

निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 3,59,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले…

ByBymnewsmarathi Feb 25, 2026

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात पाककला उपक्रम उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २१/ ०२ /२०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

प्रतिनिधी. इद्रायणी  नदी संवर्धनासाठी देहू–आळंदी–चऱ्होली येथे भव्य स्वच्छता अभियान आळंदी , १९ फेब्रुवारी २०२६ : जेव्हा सेवा हीच…

ByBymnewsmarathi Feb 20, 2026

बारामती! दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय.

प्रतिनिधी – मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो हा रमजान महिना दिनांक १९ फेब्रुवारी २०२६…

ByBymnewsmarathi Feb 20, 2026