प्रतिनिधी – फिरोज भालदार
मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज हा एक महिन्याचे उपवास धरतात व दानधर्म करतात . रमजान महिन्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वडगाव निंबाळकर येथील मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बहुजन हक्क परिषद चे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क परिषदचे बारामती तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड , युवा नेते पांडुरंग घळगे , महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इफ्तार पार्टीसाठी वडगाव निंबाळकर युवराज राजेश्वरराजे राजेनिंबाळकर, ऋषिकेश शिंदे, बहुजन हक्क परिषद जिल्हाध्यक्ष केशवदादा भोसले ,कार्याध्यक्ष राहुल जाधव, मा सभापती पंचायत समिती बारामती संजय भोसले, पळशी सरपंच माणिकआबा काळे ,पत्रकार हेमंत गडकरी, पत्रकार सुनील जाधव, महेंद्र माने (जादूगार शिवम), वडगाव निंबाळकर तंटामुक्ती अध्यक्ष सचिन साळवे, माजी सरपंच संजय साळवे , अण्णा खुडे ,अनिल खोमणे , अविनाश माळशिकारे, धीरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभेच्छा देताना माणिकआबा काळे यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपण इफ्तार पार्टी घेतली मात्र पुढच्या वर्षी आपल्या वडगाव निंबाळकर व पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांसाठी या पलीकडे काहीतरी वेगळे व मोठ्या पद्धतीने असे इफ्तार पार्टीचे आयोजन बहुजन हक्क परिषद व माणिकआबा काळे यांच्या वतीने करण्यात येईल असे काळे यांनी शुभेच्छा देताना सांगितले . आलेल्या सर्व उपस्थितांनी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व असेच सर्व मिळून एकोप्याने राहून सर्व धर्मांचे सर्व धर्मीय सण साजरे करून सर्वधर्मसमभावाने एकत्र राहू असे संबोधले . या कार्यक्रमा वेळी वडगाव निंबाळकर मधील मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .









