परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी तालुक्यातील मांडवा येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल साखरे यांना नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये कृषी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल परळी त्यांचा मित्रमंडळी कडून पुष्पहार, शाल श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येत. यावेळी मांडवा येथील प्रगतशिल शेतकरी विठ्ठल साखरे यांना शेतीनीष्ठ कृषी मित्र पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले. या साहित्य संमेलनात शेतीनिष्ठ शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार मांडवा येथील प्रगतशिल शेतकरी विठ्ठल साखरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेतकरी विठ्ठल साखरे यांचे शेती क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा कार्याचा मान्यवरांच्या हस्ते उचित गौरव कारण्यात आला.पापनाथेश्वर माध्यमिक विध्यालय नाथरा येथे ६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अतिशय उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाले. संमेलनाचे मुख्यसंयोजक डॉ एकनाथ मुंडे ,संस्थेचे सचिव डॉ संतोष मुंडे तसेच कार्यक्रमाचे प्रसिद्ध दंगलकार कवी डॉ स्वप्नील चौधरी, अध्यक्ष न.प.परळीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रसिद्ध साहित्यिक नागनाथ बडे,प्रा विठ्ठल जायभाय , राजेंद्र पाठक, डॉ रमेशचंद्र काबरा,संपादक सतिश बियाणी, सामाजिक कार्यकर्ते भास्करमामा चाटे, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली लांब,परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे साहेब,उपनिरीक्षक गणेश झाम्बरे साहेब, सौ.शुभांगीताई गित्ते, संमेलनाच्या कार्यवाहक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलेखा मुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उतुंग यशाबद्दल परळीत बालाजी पान सेंटर व न्यू भारत फोटो स्टुडिओच्या दालनात विठ्ठल साखरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अमर देशमुख, धनंजय आढाव, गोविंद मुंडे, नानासाहेब जाधव, संजय रॉय, प्रशांत रामदासी, जितेंद्र मस्के, गोविंद चांडकं, यशवंत चव्हाण, श्रीराम लांडगे, श्रीकृष्ण चाटे, श्री.वाघमारे, मारोती साखरे, महादेव गित्ते व इतर उपस्थित होते. तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.