• Home
  • इतर
  • पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद
Image

पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद

प्रतिनिधी

2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलिसाला स्वतंत्र असा झेंडा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेव्हापासून तो दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्थापना दिनापासून सात दिवस पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो निमित्त पोलीस व जनता यामधील संबंध सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम साजरे केले जातात पोलीस खात्याची ओळख विद्यार्थी व जनतेला करून दिली जाते.

जनता भिमुख पोलिसिंग हा त्यातील महत्त्वाचा उद्देश असतो पोलिसांची जनतेला भीती न वाटता आदर वाटावा यासाठी विविध प्रोग्राम घेतले जातात याचाच भाग म्हणून पोलीस खात्यामध्ये विविध प्रकारची शस्त्रे दारूगोळा असतात यांचं विद्यार्थ्यांना नेहमी विद्यार्थ्यांना कुतूहल असते अशा शस्त्रांची ओळख त्यांना करून देण्यात आली सदरचा कार्यक्रम टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी घेण्यात आला.तसेच दोन दिवसांपूर्वी वाहतुकीच्या चिन्हांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगून पोलीस खात्यात विविध पदावर असणाऱ्या पोलीस अधिकारी कसा ओळखावा याबाबत सुद्धा पोलिसांच्या गणवेशावर लावण्यात येणाऱ्या रँक ची माहिती करून देण्यात आली. सदरचे कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे फौजदार काळे पोलीस हवालदार अतुल जाधव यांनी आयोजित केले

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025