• Home
  • माझा जिल्हा
  • बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Image

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी

बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे

 बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे; परिसरात बिबट दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी केले आहे.

मौजे खांडज परिसर हा निरा डावा कालवा ते निरा नदी दरम्यान

बागायत पट्टा असून मोठ्या प्रमाणात

दाट उसशेतीचा परिसर आहे. त्यामुळे या भागात गेल्या वर्षभरात खांडज, शिरवली व माळेगाव बु.च्या काही भागात बिबटचा वावर असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव पशुधन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

या परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर दिसून आल्याने वस्तीवरील शेतकरी, ग्रामस्थ व मजूरवर्ग यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कळताच प्रादेशिक वन विभागाच्यावतीने तात्काळ बिबट प्रवण परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह रेसक्यू पथक, वनपाल, वनरक्षक मिळून नियमित रात्रगस्त, पाहणी दौरा करण्यात आहे. परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. बिबट प्रवण परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

बिबट दिसल्यास नागरिकानी घाबरू नये, नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करू नये; विशेषतः लहान मुले स्त्रिया व मजूरांनी आपली व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी, वन विभागाच्या ९६५७८८०८८८, ७३८७७७१०५० दूरध्वनी क्रमांकावर

संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026