• Home
  • क्राईम
  • MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून 40 विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक.
Image

MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून 40 विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक.

प्रतिनिधी

एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील अनेक विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या तेलंगणातील एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपीने आतापर्यंत ४० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीविरोधात यापूर्वी हैदराबाद आणि मुंबईत फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा (वय ४७, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकाची आरोपी अरविंद आरोगोंडा याने आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपीला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याला ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. पुण्यातील येरवडा परिसरातील एकाची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला येरवडा पोलिसांनी तपासासाठी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कामगिरी केली.

आरोपी आणि त्याच्या साथीदाराने एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि. नावाची कंपनी हैदराबादमध्ये सुरू केली होती. या कंपनीच्या पुण्यासह मुंबईत शाखा सुरू केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात त्याने सोशल मीडियावर व्हायरल केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी पाच लाख रुपये, खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये असे शुल्क तो आकारत होता. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करू, असे आमिष त्याने दाखवले होते.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026