Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!
Image

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी:

वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय देणाऱ्या साथीदाराला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०५ च्या पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे.

​१. रोहीत भारत गायकवाड (वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. १०६ गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) – मुख्य फरार आरोपी.

२. ऋतिक उर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६ वर्षे, रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) – आश्रय देणारा आरोपी.

​वानवडी पोलीस स्टेशन येथील गु.रं.नं. ५२६/२०२५ मधील मोक्का व इतर गंभीर कलमांखालील गुन्ह्यातील आरोपी रोहीत गायकवाड हा गेल्या एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हा फरार आरोपी बारामतीमधील वाघळवाडी येथील कन्नडवस्ती येथे राहणाऱ्या ऋतिक उर्फ काल्या रावळकर याच्या घरी लपून बसला आहे.

​या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने वाघळवाडी येथे जाऊन छापा टाकला. तेथे मुख्य आरोपी रोहीत गायकवाड पोलिसांच्या हाती लागला. धक्कादायक बाब म्हणजे, रोहीत हा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी आहे हे माहीत असूनही ऋतिक रावळकर याने त्याला आपल्या घरात आश्रय दिला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

​सदरची धडक कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​या कारवाईत गुन्हे शाखा युनिट ०५ चे पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, तसेच पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, शहाजी काळे, अमर चव्हाण, परमेश्वर कदम, शशिकांत नाळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, सुधीर सोनवणे, स्वाती तुपे, जयदेव भोसले, नेत्रिका अडसुळ, नासेर देशमुख आणि महिला पोलीस अंमलदार मयुरी पालवे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Releated Posts

जेजुरी पोलिसांची निरा येथे ऑनलाइन जुगारावर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी   निरा गावातील वॉर्ड क्रमांक ६, बजाज शोरूमजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळविला जात असल्याची…

ByBymnewsmarathi Aug 20, 2026

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026