मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

मूर्टी येथे पत्त्याच्या जुगारावर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

mnewsmarathi 03 Jul 2026 1 मिनिट वाचन 9,435 वाचन

बारामती, दि. ३ जुलै : वडगाव निंबाळकर पोलिसांनी मूर्टी (ता. बारामती) येथे सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर कारवाई करत तिघांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास मूर्टी गावातील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्री शेडच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही जण बेकायदेशीररित्या “१३ पानी” नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत संपत चंदर बालगुडे (वय ५४, रा. मूर्टी , ता. बारामती), सुरेश सदाशिव पवार (वय ५२, रा. करंजेपूल, ता. बारामती) आणि गणेश सुरेश जाधव (वय ३२, रा. तरडोली, ता. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून १,४०० रुपये रोख रक्कम तसेच ५२ पानांचे दोन पत्त्यांचे कॅट जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र विलास यादव यांनी फिर्याद दिली असून त्यावरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईमुळे मूर्टी व परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले भविष्यात देखील अशा अवैध्यव्यवसायिकांचे पोलीस प्रशासन कंबरटे मोडेल अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi