• Home
  • ताज्या बातम्या
  • वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम
Image

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम

प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याअंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:

रंगीत (ब्लॅक फिल्म) काचा असलेली वाहने – 18 केसेस, ₹19,500 दंड.

फॅन्सी/कलर नंबर प्लेट अथवा नंबर प्लेट नसलेली वाहने – 10 केसेस, ₹7,000 दंड.

दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास – 8 केसेस, ₹8,000 दंड.

वैध वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence) नसणे – 4 केसेस, ₹20,000 दंड.

विना हेल्मेट दुचाकी चालविणे – 6 केसेस, ₹6,000 दंड.

मालवाहू वाहनांवर आवश्यक रेड रिफ्लेक्टर नसणे – 12 केसेस, ₹12,000 दंड.

बुलेट मोटारसायकलमध्ये मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर बसविणे – 6 केसेस, ₹6,000 दंड.

इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन – 20 केसेस, ₹15,000 दंड.

एकूण कारवाई : 84 केसेस
एकूण दंड : ₹93,500/-

सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वाहनावर नियमबाह्य बदल करू नयेत तसेच वैध कागदपत्रे बाळगावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही लहान मुलांना वाहन देणे अवजड वाहने यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल्ल, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिराजदार, बारामती विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. जीवन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल साबळे, पोलीस हवालदार नाळे, पोलीस हवालदार खेडकर, पोलीस हवालदार देवकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधव, धोत्रे, भोसले, यादव व सोनवणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Releated Posts

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा ; वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुकीत बदल.

प्रतिनिधी – मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

अश्लील मेसेज, ब्लॅकमेल आणि फेक इन्स्टाग्राम; कारंजे येथील युवकांवर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

वडगाव निंबाळकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलेचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करणे,…

ByBymnewsmarathi Jul 7, 2026