Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.
Image

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात

 मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि भक्ती, सेवा व संस्काराचं प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक ह.भ.प. मारुती धोंडीबा मोरडे (अण्णा गुरुजी) यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी वारकरी सेवेचं रोवलेलं बीज आज वटवृक्षात रूपांतरित झालं आहे. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालं असून, मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी पंढरपूरमध्ये हक्काचं घर उभं राहिल्याचा आनंद व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते मा. दिलीप वळसे-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, वारकरी सेवा मंडळ, देणगीदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी उभारलेली ही वास्तू उभी राहिली आहे. या कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या सर्वांचं मनापासून कौतुक केलं. तसंच या वास्तूची स्वच्छता, जपणूक आणि पावित्र्य कायम राखणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचंही अधोरेखित केलं.

यावेळी आदरणीय दादांच्या पंढरपूर विकासाच्या दूरदृष्टीचाही आवर्जून उल्लेख केला. वारकऱ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पंढरपूर जागतिक दर्जाचं धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावं, यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. पालखी मार्ग, पायाभूत सुविधा आणि वारकरी-केंद्रित विकासकामांमागे त्यांची स्पष्ट भूमिका आणि दूरदृष्टी होती. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित विकासकामं पूर्ण करण्यासाठी आम्ही शासन म्हणून कटिबद्ध असल्याचंही यावेळी नमूद केलं.

तसंच, वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ₹४,००० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट, पालखी तळ, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमुळे वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील, असंही मी नमूद केलं.

आषाढी वारीसाठी शासनाकडून सर्व आवश्यक नियोजन करण्यात आलं असून, प्रत्येक वारकऱ्याची वारी सुखकर, सुरक्षित आणि मंगलमय व्हावी, हीच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना व्यक्त केली.

Releated Posts

सोमेश्वरच्या उच्चांकी ऊसदरामुळे सभासदांमध्ये आनंदोत्सव; चेअरमन, संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

प्रतिनिधी   बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचा निर्णय घेत अनुदानासह जवळपास ४…

ByBymnewsmarathi Aug 20, 2026

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026