Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!
Image

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील एका घरावली अचानक मोठी दरड कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागवण्यात आली आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे विशेष पथक (ज्यामध्ये १ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवान समाविष्ट आहेत) सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. सध्या तिथे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

दरड कोसळल्यामुळे आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गावरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे-मुंबई तसेच मुंबई-पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे-मुंबई किंवा मुंबई-पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अत्यंत अत्यावश्यक प्रवास असल्यास, कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा.

महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक: 

​पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष): लँडलाईन: 020-26123371 | टोल फ्री: 1077 | मोबाईल: 93709 60061

​PMRDA – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PDRF): 95452 82930

प्रशासनातर्फे आव्हान:

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा व प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Releated Posts

सोमेश्वरच्या उच्चांकी ऊसदरामुळे सभासदांमध्ये आनंदोत्सव; चेअरमन, संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

प्रतिनिधी   बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचा निर्णय घेत अनुदानासह जवळपास ४…

ByBymnewsmarathi Aug 20, 2026

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026