मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

mnewsmarathi 10 Jul 2026 1 मिनिट वाचन 8,694 वाचन

प्रतिनिधी

पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार दि.७ जुलै रोजी विविध क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज शशिकांत कंक व सिद्धार्थ कंक, छ. उदयनराजे भोसले यांचे सुपा परगना प्रमुख सुनिल राजेभोसले, छ. शिवाजी महाराज यांचे व्याही पिलाजीराव राजेशिर्के यांचे वंशज अमितराजे राजेशिर्के, सरनौबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वंशज इंद्रजितसिंह घोरपडे (हिंदुराव) गजेंद्रगडकर, छ. संभाजीराजे यांची दुधआई धाराऊ गाडे यांचे वंशज बाबुराजे गाडे व मयुर गाडे तसेच माजी आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सातव, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त विवेक देव, सामाजिक कार्यकर्त्या मीनाकाकी सातव पाटील, जिल्हा परिषद सदस्या कोमल आव्हाळे, नगरसेविका रत्नमालाताई सातव, कविताताई गलांडे, श्वेताताई गलांडे, जि.प.सदस्या रोहिणी कदम-ढोले, सुरेखाताई हरगुडे या प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारार्थी यांचा सन्मान करण्यात आला.

    सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, पत्रकार, वैद्यकीय, योगा, निवेदन, पोलीस प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

 या प्रतिष्ठित सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार दैनिक पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना देण्यात आला असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन स्पंदन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कामिनीताई शरद राजेभोसले- ताकवले, उपाध्यक्ष नेहा ताकवले (जहागिरदार), खजिनदार ऋषिकेश ताकवले (जहागिरदार) यांनी केले होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना कामिनीताई राजेभोसले- ताकवले यांनी तर आभार अमित राजेभोसले यांनी मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल बनकर यांनी त्यांच्या बहारदार शैलीत केले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi