• Home
  • इतर
  • श्री. रूपीचंद किसनराव जगताप. रा. चोपडज, ता. बारामती, जि. पुणे यांचे वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन.
Image

श्री. रूपीचंद किसनराव जगताप. रा. चोपडज, ता. बारामती, जि. पुणे यांचे वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन.

 प्रतिनिधी

वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी येथे गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी चोपडज येथील युवक श्री. रूपीचंद किसनराव जगताप यांनी आपल्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी मधील निवासी अनाथ व निराधार मुलां-मुलींना मिष्ठान्न भोजन देवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.

आजकाल समाजातील अनेक व्यक्ती आपल्या मुलांचा, नातवाचा स्वतः आपला वाढदिवस मोठया धूम-धडाक्यात गाजावाजा करत साजरा करण्यात व्यस्त असतात व मोठा खर्च व्यर्थ करत असतात परंतू चोपडज, ता. बारामती, जि. पुणे येथील शेतकरी कुटूंब श्री. किसनराव ढगुराव जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. बेबीताई किसनराव जगताप यांनी आपला मुलगा श्री रूपीचंद किसनराव जगताप यांचा ३४ वा वाढदिवस वाघळवाडी येथील उत्कर्ष प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील मुलां-मुलींसमवेत साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

श्री. किसनराव जगताप यांचे कुटूंबीयांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन देवून मुलांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुलविले. तसेच आश्रमशाळेसाठी आवश्यक ती वस्तू रूपामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष, अजिंक्य हनुमंतराव सावंत, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या श्रीम. रोहिणी हनुमंतराव सावंत यांनी श्री. किसनराव जगताप कुटुंबीयांचे आभार मानले. कार्यक्रमास श्री. ढगुराव रामभाऊ जगताप (आजोबा), सौ. काजलताई रूपीचंद जगताप (पत्नी), कु. समृध्दी, सृष्टी श्रेया व श्री. तायाप्पा जाधव तसेच रूपीचंद जगताप यांचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार उपशिक्षक श्री. किरण चाबुकस्वार यांनी केले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025