मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ४,४६,५०० रुपयांची देशी व हातभट्टीची दारू जप्त, दोन आरोपी अटकेत

mnewsmarathi 27 Aug 2026 1 मिनिट वाचन 3,962 वाचन

 प्रतिनिधी

माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४,४६,५०० रुपये किमतीची देशी दारू, हातभट्टीची दारू आणि वाहने असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​

पुणे जिल्ह्याबाहेरून होणारी अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कैतन कदम यांनी कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. कुलदीप संकपाळ व त्यांचे पथक हद्दीत गस्त घाजत असताना, कऱ्हावागज चौक येथे एका संशयास्पद मारुती सुझुकी कारची (MH-12-KT-0341) तपासणी केली.

​तपासणीदरम्यान गाडीत ३३ बॉक्स देशी दारू (किंमत १,१७,००० रुपये), दोन प्लास्टिकच्या कॅनमध्ये ३० लिटर हातभट्टीची दारू (किंमत १८,००० रुपये), तसेच मारुती सुझुकी कार व हिरो होंडा स्पेंडर मोटारसायकल असा एकूण ४,४६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​आरोपींची नावे:

​शेखर श्रीरंग पवार (वय २४ वर्षे, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)

​कैलास शंकर गव्हाणे (वय ३८ वर्षे, रा. माळेगाव बु॥, ता. बारामती, जि. पुणे)

​या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १२३, ३(५) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास साळवे करत आहेत. ही धडक कारवाई माळेगाव पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi