मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 14 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती! ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये भालदार कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप.

mnewsmarathi 27 Aug 2026 1 मिनिट वाचन 4,911 वाचन

वडगाव निं.प्रतिनिधी –

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ आणि २ मध्ये मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, बंधुभाव, एकोपा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भालदार कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात आपुलकी, सद्भावना आणि सामाजिक एकतेची भावना दृढ व्हावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi