मुख्य मजकुरावर जा
Friday, 4 September 2026

यवत पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० जिवंत काडतुसे जप्त.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 4, 2026 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून दोन गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे आणि दोन लोखंडी मॅगझिन असा सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे येथे मंगलमूर्ती मिसळ हॉटेलजवळ समीर सय्यद हा गावठी पिस्तुल बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी समीर जावेद सय्यद वय २६ वर्षे, रा. सहकार नगर, टिळेकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विक्री अथवा हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात ठेवलेली दोन लोखंडी गावठी पिस्तुले, १० पिवळ्या धातूची जिवंत काडतुसे आणि दोन लोखंडी मोकळी मॅगझिन आढळून आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, ७ व २५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी समीर सय्यद याच्याविरुद्ध यापूर्वीही तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दोन गुन्हे यवत पोलीस ठाण्यातील, तर एक गुन्हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेटलवाड करीत आहेत. तसेच, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविषयी नागरिकांना काही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस दौंड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पो.हवा. रॉकी देवकाते, पो.हवा. संदिप देवकर, पो. कॉ. धिरज जाधव, पो.कॉ. अमोल भुजबळ, पो.कॉ.प्रतिक जगताप, पो.कॉ. सचिन गुंड, पो.कॉ. दिनेश लोणकर व पो.कॉ. विनित कुऱ्हाडे यांचे पथकाने केली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख